शोषणव्यवस्थेतील सडलेपणाचे भयकारी वास्तव
००००००००००
राजा शिरगुप्पे
कालच्याच लेखात मी म्हटलं होतं, मराठी सिनेमा आता गंभीर होऊ लागलाय आणि जागतिकीकरणाच्या परिघात स्वतःला शोधू लागलाय. मिलींद शिंदे दिग्दर्शित आणि अभिनित ‘नाच तुझंच लगीन हाय’ पाहिला आणि थरारलोच. माझ्या आधीच्या विधानाला आतली एक पुस्ती आता जोडतो की ‘मराठी सिनेमा आता प्रौढ आणि प्रगल्भही झाला आहे.’ ‘मिलींदचा हा सिनेमा पाहताना मी मराठी सिनेमा पाहतोय, मराठीत असा विषय मांडला जातोय, प्रादेशिकतेच्या मूर्ख आणि बाजारू मर्यादा तोडून हा सिनेमा व्यवस्थेने निर्माण केलेल्या मनोविकृतींचा धांडोळा घेतोय, तळातल्या शोषित माणसाचं विस्कटलेले अंतरंग उलगडून दाखवतोय,’ असे एकामागोमाग एक आश्चर्याचे आणि आनंदाचे धक्के मला बसत होते.
कुठलीही विषमताधिष्ठीत व्यवस्था ज्या सामाजिक विकृती करीत निर्माण असते, त्याचा अपरिहार्य परिणाम व्यक्तीवर होत असतो. तिचे मानसिक संतुलन बिघडून ती सामाजिक व्यवहारांनाही विसंगत आणि विकृत करते. भारतीय समाजव्यवस्था अशा विसंगती आणि विकृती निर्माण करणाऱ्या परिस्थितीचा महास्रोतच आहे. इथं आर्थिक विषमता आहे, जातीय-धार्मिक भेदाभेद आहेत, स्त्री-पुरूष असमानता आहे, प्रादेशिक-भाषिक वैरभाव निर्माण करणारे फरक आहेत. या सर्वांचा अंतिमतः एकच हेतू आहे की वरच्या वर्गाने खालच्या वर्गाला चरकातल्या उसासारखं पिळून अमानुष आणि हिंस्र शोषण करणे. या प्रचंड दुःखाशी सामना करू न शकणारा हा शोषित माणूस मग या व्यवस्थेच्या अगदी तळाशी असलेल्या आणि केवळ अपार दुःखाशीच बांधील असलेल्या ‘स्त्री’ नावाच्या जीवावर सूड उगवत राहतो, तिला भीषण शोषत राहतो. विकृत व्यवस्थेनं विकृत झालेला हा शोषित माणूस व्यवस्थेने दुर्बल ठरवलेल्या स्त्रीला आपल्या विरेचनाचा आधार बनवतो. कुठल्याही विकृतीची परिणती ही हिंसा आणि क्रौर्यामध्येच होत असते आणि ते अनुभवणे खूपच भीषण आणि बीभत्स असते. काहीवेळा ते खूप बटबटीतही होऊ शकते. तरीही या विकृतीचे दर्शन घडवून या व्यवस्थेचे खरे स्वरूप उघड करणे हे कलेचे आणि कलाकाराचे कर्तव्यच असते. मिलींदने प्रेक्षकांशी संवाद साधताना एका पाकिस्तानी कवीचा संदर्भ देत अगदी योग्य शब्दांत सांगितलं होतं की, ‘समाज निरोगी ठेवणं हेच कलावंताचं काम आहे आणि त्यानं ते योग्यरित्या पार पाडलं नाही तर तो शिक्षेस प्राप्त आहे.’ कलावंतावरची ही नैसर्गिक जबाबदारीच आहे. पण त्यासाठी त्याला खूप धाडसही अंगी ठेवावं लागतं. कारण समाजाच्या निरोगीपणासाठी हे जागल्याचं काम करताना त्याला या समाजाचं नियंत्रण करणाऱ्या समग्र व्यवस्थेच्या विरोधातही ठामपणे उभे राहावे लागते. त्यासाठी आपले भौतिक फायदे आणि हितसंबंध कठोरपणे तोडावे लागतात, गमवावे लागतात, तेव्हाच तो आपले निसर्गदत्त कर्तव्य बजावू शकतो. हे धाडस या सिनेमामागच्या सर्व कर्त्यांनी केलं आहे.
या सिनेमाचा नायक आहे, स्मशानात प्रेत पुरण्यासाठी खड्डे उकरण्याचं काम करून पोट भरणाऱ्या जातीतला. म्हणजे भारतीय समाजव्यवस्थेतील अमानुष शोषण असणाऱ्या जातीय उतरंडीतला अगदी तळचा. त्यामुळे त्याच्या सर्वच नैसर्गिक आशा-आकांक्षापासून कायमचा वंचित ठेवला गेलेला. प्रेमासारख्या नैसर्गिक भावनेचंही त्याला या व्यवस्थेनं दमन करायला लावलं. त्याची आईही याच व्यवस्थेने केवळ आपली भोगदासी म्हणून वापरलेली आणि लैंगिक शोषणातच प्रेम शोधणारी. त्याची लहानपणापासून अशा विचित्र घुसमटीत वाढ झालेली. जातीव्यवस्थेनं त्याला त्याचं एकतर्फी प्रेमही गुदमरून टाकतं. अशा जातीय-धार्मिक, सामाजिक तणावांनी आणि दबावाने त्याची नैसर्गिक बंडखोरी कोंडीत सापडल्याने वाट मिळण्यासाठी फुरफुरतेय. त्यातच अपघातानं झालेली स्त्रीदेहाची ओळख त्याला आणखीच अशांत बनवते. या सर्वांची परिणीती बाकीच्या समाजाला तो मनोविकृत वाटावा अशा त्याच्या वर्तनात होते. स्त्रीचा मृतदेह उकरून तो न्याहाळत बसण्यापासून मृत प्रेयसीचा देह घरात आणून ठेवून तिच्याशी लग्न करण्याचा भ्रमिष्ट आनंद मिळवण्यापर्यंत त्याचं हे वर्तन वाढत जातं. त्याच्या पौरूषत्वाला आव्हान देऊन त्याच्याशी लग्न केलेल्या त्याच्या जिवंत बायकोला मग या पुरूषप्रधान व्यवस्थेतून तयार होणाऱ्या त्याच्या तथाकथित विकृत पौरूषत्वाचं बळी व्हावं लागतं. ही भारतीय समाजव्यवस्थेने आपल्या जातीय-धार्मिक सत्तेने, पुरूषप्रधानतेनं आणि गरिबी-श्रीमंतीच्या वर्गीय शोषण व्यवस्थेने इथला शोषित माणूस कसा अ-मानव करून टाकला आहे, छिन्नभिन्न केला आहे, विस्कटून टाकला आहे, याचं भयावह दर्शन मिलींद आपल्या दिग्दर्शनातून आणि अभिनयातून घडवत जातो. चांगल्या चित्रपटात सारं काही चांगलंच असतं. त्यामुळे अभिनय, संगीत, छायाचित्रण इ. बाबींबद्दल वेगळं काही बोलण्याची गरज चांगल्या चित्रपटाबद्दल बोलताना मला वाटत नाही. तरीही मिलींदबरोबर छाया कदमनंही आपली भूमिका दमदार पेललीय हे नमूद करायलाच हवं.
विकृत व्यवस्था व्यक्तीला उद्ध््वस्त करते आणि उद्ध््वस्त व्यक्ती समाज विस्कटून टाकतात, असा हा दुहेरी पेच आहे. भारतीय समाजाचे हे सडलेपण एवढ्या ताकदीनं दाखवायला खूप धाडस हवं. ते धाडस मिलींद शिंदे आणि संजय खामकर या दिग्दर्शक निर्मात्या जोडगोळीने दाखवलंय.
आता ते बघण्याचं धाडस प्रेक्षकांनी दाखवायला हवं. कारण माझा अनुभव आहे, की ते धाडस अजूनही आपल्या प्रेक्षकांत आलेलं नाही आणि मिलींद तर या व्यवस्थेला नागडं करतोय...
°°°°